औपचारिक पत्रलेखन

  • पुढील माहिती वाचा, ही माहिती नोटबुक मध्ये लिहिण्याची गरज नाही.
  • Assignment मध्ये दिलेला प्रश्न Composition NoteBook मध्ये सोडवावा.
  • पत्र लिहिताना पुढील महितीचा उपयोग होईल.
  • पत्र लेखनावर विडिओ तयार झाल्यावर देण्यात येईल.
पत्र-लेखन 

===========
पत्रांचे प्रकार
  • औपचारिक पत्र
  • अनौपचारिक पत्र



=========
अनौपचारिक पत्र-
कोणाला- कौटुंबिक व्यक्ती, नात्यातल्या व्यक्ती, आपुलकीचे संबंध असलेल्या व्यक्ती, मित्र-मैत्रिणी अशांना लिहिलेले पत्र
पत्राचे स्वरूप- वैयक्तिक, खाजगी, भावनांचे प्रकटीकरण, अभिनंदन, आभार, सांत्वन, क्षेमकुशल विचारणे
पत्रात विषय लिहिण्याची गरज नाही.
==========
औपचारिक पत्र
कोणाला- सरकारी कार्यालय, कंपन्यांची कार्यालये, विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, उद्योग व्यवसाय, अधिकारी वर्ग, व्यवस्थापक, संचालक, लोकप्रतिनिधी,
पत्राचे स्वरूप- कार्यालयीन कामकाज, व्यावसायिक हेतू, तसेच विशिष्ट कामासाठी, माहिती, चौकशी, तक्रार, मागणी, विनंती, अर्ज, खरेदी-विक्री,
पत्रात विषय लिहिणे आवश्यक
तो विषय व उद्देश याविषयीच मजकूर लिहिणे आवश्यक. मजकूर थोडक्यात; पण सर्वसमावेशक असावा. यात त्याव्यतिरिक्त इतर गोष्टी लिहायच्या नसतात.
==========
पत्राचे प्रारूप-
  • दिनांक-
  • प्रति-
  • विषय-
  • मायना-
  • मजकूर-
  • शेवट-
  • पत्र पाठवणार्‍याचा पत्ता-
पत्र लिहितांना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
============
उदाहरणादाखल प्रश्न -

दिनांक- ५ जून, २०२०.
( स्वल्पविराम व पूर्णविराम याकडे लक्ष द्या)
===========
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव दाभाडे,
जि. - पुणे.

प्रति नंतर स्वल्पविराम आहे. प्रत्येक प्रत्येक मुद्द्यानंतर स्वल्पविराम आहे. जि हे जिल्हा हा याचे संक्षिप्त रूप असल्यामुळे त्यानंतर पूर्णविराम आहे. त्यानंतर संयोग चिन्ह आहे. पुणे या शब्दानंतर पत्ता संपतो. त्यामुळे तेथे पूर्णविराम आहे.
यानंतर पिनकोड असता तर पिन- ४१० ५०७. अशाप्रकारे लिहिला असता. पिन यानंतर संयोग चिन्ह आहे. नंतरचा क्रमांक तीन-तीन संख्यांच्या गटात विभागला आहे. पिनकोड पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम आहे.

===========
विषय 

विषय : शाळेसाठी रोपांची मागणी.

काही विषयांचे नमुने- रोपांची मागणी करण्याबाबत, वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी. वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. शाळेतील उद्यानासाठी रोपांची मागणी.

विषय यानंतर अपूर्णविराम (:)आहे. काहीजण संयोग चिन्ह पण देतात. विषय संपल्यानंतर पूर्णविराम आहे. विषय अधोरेखित करावा.

===========
मायना 

माननीय महोदय,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
काहीजण फक्त माननीय महोदय एवढेच लिहितात. काहीजण स. न. वि. वि. असे संक्षिप्त रूप करतात. काहीजण सप्रेम नमस्कार एवढेच लिहीतात.
महोदय नंतर स्वल्पविराम आहे. अभिवादन पूर्ण झाल्यावर पूर्णविराम आहे.

============
मजकूर

स्वतःची ओळख
पत्राची प्रेरणा
ट्रस्टचे अभिनंदन
शाळेची बाग व पटांगण, शाळेसमोरचा रस्ता
सध्या झाडे आहेत, त्यात भर घालण्यासाठी.
झाडांचे / रोपांचे प्रकार - पटांगणावर व रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी उंच वाढणारी झाडे, बागेसाठी सौंदर्यात भर घालणारी व फुलझाडांची रोपे.
वृक्षारोपण व संवर्धन यांची हमी
अंदाजे किती रोपे हवीत.
रोपे घेण्यास शाळेची गाडी व कर्मचारी तुमच्या सांगण्याप्रमाणे, तुम्ही दिलेल्या वेळेवर पोचतील.
============
कळावे, तसदीबद्दल क्षमस्व!

कळावे नंतर स्वल्पविराम आहे. तसदीबद्दल क्षमस्व यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे.
===========
शेवट

आपला कृपाभिलाषी,
अ. ब. क.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
आदर्श विद्या मंदिर,
महात्मा फुले मार्ग,
तळेगाव दाभाडे,
जि. - पुणे.
ई-मेल - abc@example.com

विरामचिन्हाकडे लक्ष द्या. कंसाचा उपयोग केला नसल्यास प्रतिनिधी नंतर स्वल्पविराम द्या. ई-मेल लिहितांना संयोग चिन्ह वापरले आहे. ई-मेल विशिष्ट प्रारूपात द्यावा. abc@adarshvidya.org , xyz@gmail.com , abc2020@yahoo.com इत्यादी.

Comments

Popular posts from this blog

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ