पुढील माहिती वाचा, ही माहिती नोटबुक मध्ये लिहिण्याची गरज नाही. Assignment मध्ये दिलेला प्रश्न Composition NoteBook मध्ये सोडवावा. पत्र लिहिताना पुढील महितीचा उपयोग होईल. पत्र लेखनावर विडिओ तयार झाल्यावर देण्यात येईल. पत्र-लेखन =========== पत्रांचे प्रकार औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र ========= अनौपचारिक पत्र- कोणाला- कौटुंबिक व्यक्ती, नात्यातल्या व्यक्ती, आपुलकीचे संबंध असलेल्या व्यक्ती, मित्र-मैत्रिणी अशांना लिहिलेले पत्र पत्राचे स्वरूप- वैयक्तिक, खाजगी, भावनांचे प्रकटीकरण, अभिनंदन, आभार, सांत्वन, क्षेमकुशल विचारणे पत्रात विषय लिहिण्याची गरज नाही. ========== औपचारिक पत्र कोणाला- सरकारी कार्यालय, कंपन्यांची कार्यालये, विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, उद्योग व्यवसाय, अधिकारी वर्ग, व्यवस्थापक, संचालक, लोकप्रतिनिधी, पत्राचे स्वरूप- कार्यालयीन कामकाज, व्यावसायिक हेतू, तसेच विशिष्ट कामासाठी, माहिती, चौकशी, तक्रार, मागणी, विनंती, अर्ज, खरेदी-विक्री, पत्रात विषय लिहिणे आवश्यक तो विषय व उद्देश याविषयीच मजकूर लिहिणे आवश्यक. मजकूर थोडक्यात; पण सर्वसमावेशक असावा. यात ...
Comments
Post a Comment