इंतजाम ( व्यवस्था)- एक छोटीशी गोष्ट
सआदत हसन मंटो, फोटो विकिपेडिया
"सआदत हसन मंटो" यांच्या जन्मदिवसा निमित्त त्यांची एक छोटीशी गोष्ट.===
शहरांमध्ये पहिली दुर्घटना चौकातल्या हॉटेल जवळ झाली.
लगेच एका पोलिसाचा पहारा तेथे लावण्यात आला.
दुसरी दुर्घटना दुसऱ्या दिवशी एका मोठ्या किराणा दुकानाजवळ झाली.
पोलिसाला पहिल्या जागेवरून काढून दुसऱ्या जागेवर- जिथे दुसरी दुर्घटना झाली होती- तेथे तैनात करण्यात आले.
तिसरी दुर्घटना रात्री बारा वाजता स्टेशन जवळ घडली.
इस्पेक्टर साहेबांनी त्या तिसऱ्या ठिकाणी त्यात पोलिसांची ड्युटी लावली. त्या पोलिसाने काही वेळ विचार केला, आणि म्हटले, “ जिथे नवीन दुर्घटना होणार आहे, त्या ठिकाणी मला उभा करा हो साहेब!"
=== कथा संपली===
"सआदत हसन मंटो" हे एक हे एक संवेदनशील, प्रतिभाशाली हिन्दी-उर्दू साहित्यिक होते. त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा (Awareness) यांचे उघडपणे दर्शन होते. त्यांच्या आयुष्यातील मोठी जखम म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी. दोन्ही देशांतील दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधतेने त्यांना दु:खी केले. या काळातील वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी, हे गुण त्यांच्यात दिसतात.
मंटोचे घराणे मूळचे काश्मिरचे. नंतर ते पंजाबमध्ये येऊन राहिले. मंटो पहिल्यापासूनच क्रांतिकारक प्रवृत्तीचा होता. मंटोला वाचनाची जबरदस्त आवड होती. मंटोला एकदा लेखन हेच आपले खरे काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा त्याने तुफानी वेगाने नाटके, निबंध, व्यक्तिचित्रे आणि प्रसिद्ध कथा लिहिल्या.
(जन्म : ११ मे १९१२; मृत्यू : १८ जानेवारी १९५५)
Comments
Post a Comment