संवेदना Our Magazine


पुढील चित्रावर क्लिक करून आपले “संवेदना” Magazine फ्लिप बुक या प्रकारात वाचू शकाल.
PDF प्रकारात वाचायचे असल्यास या Magazine चे PDF (440 KB only) येथे क्लिक करावे.
====
====
आपली भाषा का चांगली होण्या- साठी आपण त्या भाषेमध्ये सक्रिय व्हायला पाहिजे. म्हणजे त्या भाषेत बोलायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, लिहायला पाहिजे. आपण मराठीसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवू यात.
त्यापैकीच एक उपक्रम म्हणून आपण " संवेदना" या नावाचे एक पाक्षिक (Fortnightly) नियतकालिक (Periodical/Magazine) सुरु करीत आहोत. यामध्ये तुम्ही लिहिलेल्या गोष्टी, निबंध, अनुभव, लेख, विनोद, कविता, चित्रे, व्यंगचित्रे इत्यादी साहित्य असेल. हे दर 15 दिवसांनी इंटरनेटवर प्रकाशित होईल. हे नियतकालिक 16 पृष्ठांचे असेल. त्याची पीडीएफ प्रत (Copy) किंवा फ्लिप बुक कॉपी तुम्ही मोबाईल वर किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून वाचू शकाल.

तुम्ही किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींनी लिहिलेले साहित्य प्रकाशित झालेले बघायला, ते वाचायला व ते साहित्य इतर बाकीचे वाचत आहेत हे बघायला तुम्हाला निश्चितच आवडेल ना?

हे पाक्षिक कसे असेल, त्याची नमुना प्रत (Sample Copy) या ठिकाणी देत आहे. यात अजून बर्‍याच सुधारणा करता येतील. उपक्रम जर आवडला असेल तर लिहायला सुरुवात करा व आम्हाला पाठवा. जसे जमेल तसे लिहायला सुरुवात करा. तुमच्या प्रयत्नात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ