Posts

Showing posts from August, 2020

X- मराठी- अक्षरभारती- उपास- पु. ल. देशपांडे. Marathi- SSC- AksharBharati- Upas- P.L.Deshpande

Image
शब्दांचा अभ्यास- https://www.hindustantimes.com माझ्या खाजगी उपोषणाची ----- मी ' आहारपरिवर्तन'  सुरू केले .  खाजगी उपोषणाची / हकीकत / चाळीत / भानगड' / नाही ती भानगड' ' / हात दाखवून अवलक्षण / पेललं नाही तेव्हा खाजगी झालं / टीकेला भीक घालणार नव्हतो. / गाढ झोपत / घोरत / दुरुत्तरे / भीष्मप्रतिज्ञा आहारशास्त्रा / चरबीयुक्त / आस्था / तज्ञ / डझनवारीने / अवहेलना केली / डाएट' / इसमाला / तिरके बोलायचे / जामून टाकले / हेडक्लार्कच्या / आहारपरिवर्तन'  ==- साखरेत सर्वात अधिक कॅलरीज ----- बशीमधले भजे उचलले. बिनसाखरेचा / साखरबंदी / वर्ज्य करणे / अवघड / पोकळ / सुरळीत / व्रतभंगाचा / निम्म्याहून / एफिशिएन्सी बार' / घासाघासागणिक /  सहस्त्रावधी / हादडून / टोमण्यामुळे / चेकाळून / केविलवाण्या / नि / लग्न ===- कुटुंबाचा मात्र माझ्या ' डाएटच्या'  ---- मला पश्चाताप झाला. पडवळे / सडपातळ / बाळसेदार / खुलासा / वजनक्षय संकल्पाला / सुरुंग/  सुरुंग लावीत / दिवाणखान्यात / खास राखीव कुरण होते / धिंगामस्तीला / धडगत नव्हती / मौनाचे / कारुण्यपूर्वक / गच्च आवळली / पश्चाताप ====- मग म...

VIII-प्रभात-कविता- किशोर बळी Prabhat Poem- Kishor Bali

Image
प्रस्तावना- जुने युग अंधार, अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद इत्यादी गोष्टींनी भरलेले होते. आता नवीन युग  आहे. हे युग ज्ञान, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोण, मानवता, लोकशाही इत्यादीवर आधारलेले आहे.  नवीन ज्ञान आणि चांगली मूल्ये यांचा स्वीकार करून आपल्या देशाचा आणि जगाचा विकास करूया. कविता व अर्थ- हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात अर्थ-  नव्या युगाच्या आकाशात नवीन ज्ञानाचे तेज सर्वत्र पसरले आहे. कलागुणांच्या क्षितिजावर  प्रतिभेची, नवनिर्मितीची  सकाळ झाली आहे. कलेच्या आणि विविध गुणांच्या क्षेत्रात लोक नवनवीन गोष्टी तयार करत आहेत. भव्य पटांगण, बाग मनोहर फुला-पाखरांचे जग सुंदर आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. अर्थ- नव्या युगाचे पटांगण,  नव्या युगाचा विस्तार  भव्य ( प्रचंड मोठा) आहे.  नवीन युग सुंदर बागेसारखे आहे. अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचे व पाखरांचे हे नवे जग अतिशय सुंदर आहे.  या नव्या जगा...

नाम (मराठी व्याकरण)

Image
नाम - वस्तूंना दिलेले नाव-   वास्तव, काल्पनिक,  दृश्य,  अदृश्य वस्तूंच्या गुणांना दिलेले नाव- प्रकार- सामान्य नाम, - मुलगा, झाड विशेष नाम,   -  सुरेश,  पिंपळ भाववाचक नाम -  हुशारी,  हिरवेपणा अभ्यासात विशेषनामांचा उपयोग लिंग, वचन, सामान्य रूप स्वाध्याय  कृती 1 - पुढील शब्दांपासून भाववाचक नामे  बनवा. सुंदर,  मधुर,  शूर,  धीर,  गंभीर,  वत्सल, नवीन, उदार, (य) मनुष्य,  पशू, शत्रु,  मित्र,  प्रौढ,  मम,  लघु, दाता/ दातृ, कर्ता/कर्तृ, प्रभू,   रसिक, (त्व) शहाणा,  देव,  मोठा,  प्रामाणिक, मूर्ख,  खरे,  साधा, चांगला,  थोर,  उदार,   (पण, पणा) श्रीमंत,  गरीब,  उंच, गोड,  वकील,  लबाड,  जादू,  हुशार,   (ई) शांत,  क्रूर,  नम्र,  सम, भव्य, दीन, स्वच्छ,  आत्मीय, उष्ण  (ता) पाटील, भिक्षु, आपला (की) गुलाम,  फसवा,  लुच्चा ( गिरी) गोड,  गार, ओला (वा) नवल,  चतुर, चपळ,...

Practice Post

Image

मुद्द्यांवरून गोष्ट

Image
खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.  मुद्दे - शाळेत जाणारा कष्टाळू - प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी - मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी - एक खराब झालेला आंबा - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.  चित्र- वेबदुनिया : आदर्श शिक्षक नासका आंबा / संगतीचा परिणाम एक राजू नावाचा मुलगा होता. तो गरीब असला तरी अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक होता. मेहनत करून तो शाळेचा गृहपाठ नियमितपणे पूर्ण करायचा. अभ्यास ही भरपूर करायचा. त्यामुळे त्याला परीक्षेत गुण सुद्धा भरपूर मिळायचे. एकदा त्याला शाळेच्या पटांगणात एक सोन्याची अंगठी सापडली. ती त्याने प्रामाणिकपणे मुख्याध्यापकांकडे नेऊन दिली. त्याच्या या गुणांमुळे तो विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आवडता होता. पण मध्येच त्याला वाईट मित्रांची संगत लागली. ते कुठून कुठून पैसे घेऊन येत. भलत्यासलत्या गोष्टींवर खर्च करत. त्यांच्यासोबत चांगले चांगले खायला प्यायला मिळाल्यामुळे राजूलाही त्यांची मैत्री आवडू लागली. त्यांच्याबरोबर राहून राजूचे वागणे-बोलणे बिघडले. त्याचे अभ्यास...

कथालेखन

Image
लेखन कौशल्य सूत्रबद्ध विचार करण्याचे कौशल्य अभिव्यक्ती कौशल्याचा विकास कल्पकता व सृजनशीलता यांचा विकास कथा कथन  लक्षात ठेवण्याच्या गोष्टी पूर्वार्ध - उत्तरार्ध कथाबीज आकर्षक, उत्कंठा व जिज्ञासा वाढवणारी सुरुवात पात्रे व स्थळ यांना योग्य नावे घटनांचा क्रम ठरवणे योग्य शब्द योग्य मुद्दे संवाद, विरामचिन्हे, वाक्प्रचार, म्हणी यांचा योग्य वापर तीन ते चार परिच्छेद कथा भूतकाळात, संवादातील काळ आवश्यकतेप्रमाणे परिणामकारक शेवट आरंभी योग्य शीर्षक शेवटी योग्य तात्पर्य कथालेखन कृतीचे प्रकार- अपूर्ण कथा पूर्ण करणे शीर्षकावरून कथा लिहिणे दिलेल्या शब्दांवरून कथा लिहिणे कथाबीजावरून कथा लिहिणे मुद्द्यांवरून कथा लिहिणे शीर्षकांची उदाहरणे- लोभी माणूस, स्वाभिमानी मुलगा प्रामाणिक नोकर दानशूर राजा न्यायी राजा जशास तसे धाडसी मुलगी प्रामाणिकपणाचे फळ आळशी नोकर उपकाराची परतफेड आदर्श मित्र राजूचे प्रसंगावधान सोनालीची समयसूचकता लबाड वाघाची फजिती अद्दल घडली चतुर न्यायाधीश व्यापाऱ्याची शिकवण म्हणींची शीर्षके करावे तसे भरावे थेंबे थेंबे तळे साचे एकी हेच बळ दुरून डोंगर साजरे उंटावरचा शहाणा तेल गेले तूप गेले, हाती ...

जागतिक तापमानवाढ

Image
जागतिक तापमानवाढ- या विषयावर आपण चर्चा करून पुढील मुद्दे काढले. त्यांचा उपयोग करून काही परिच्छेदांचा निबंध सहज तयार होईल. या मुद्द्यांमध्ये तुम्ही जास्तीचे मुद्दे सामील करू शकता किंवा काही मुद्दे कमी पण करू शकता. प्रथम एखाद्या कागदावर कच्चा/ रफ निबंध लिहा व नंतर त्यात सुधारणा करून वहीमध्ये पक्का/ फेअर निबंध लिहा.. जागतिक तापमानवाढ प्रस्तावना -  ( निबंधाची सुरुवात - तुम्ही तुमच्या प्रकारे करा) स्पष्टीकरण- कारणे – हरितगृह वायू – CO2, मिथेन, नायट्रस ओक्साइड , कारखाने, वाहने, यंत्रे, झाडे, इमारती, पाण्याचा उपसा, परिणाम- समुद्र, बर्फ, वातावरण, तुफान, माती धूप, उष्णता, जीव नष्ट, दुष्काळ , उपाय – झाडे, प्रदूषण, वीज, पर्यायी ऊर्जा , जन जागृती , कार्बन क्रेडिट , शेवट- जगणे अशक्य,

व्यायामाचे महत्त्व

Image
व्यायामाचे महत्त्व या विषयावर आपण चर्चा करून पुढील मुद्दे काढले. त्यांचा उपयोग करून काही परिच्छेदांचा निबंध सहज तयार होईल. या मुद्द्यांमध्ये तुम्ही जास्तीचे मुद्दे सामील करू शकता किंवा काही मुद्दे कमी पण करू शकता. प्रथम एखाद्या कागदावर कच्चा/ रफ निबंध लिहा व नंतर त्यात सुधारणा करून वहीमध्ये पक्का/ फेअर निबंध लिहा.. व्यायामाचे महत्त्व   मुद्दे-  प्रस्तावना – ( निबंधाची सुरुवात - तुम्ही तुमच्या प्रकारे करा) स्पष्टीकरण - कारणे- आधुनिक जीवनशैली- मोजकीच कामे - हालचाल नाही- ताण – यंत्र – खेळ - मैदान - ... नसला तर – आजारपण- आळस- प्रतिकार शक्ती कमी - अशक्त – भोजन मारक – पचन नाही - रक्ताभिसरण –कफ-पित्त-वायू - असला तर- आजारपण - आळस- तरतरी- स्फूर्ती – उत्साही - प्रतिकार शक्ती- सशक्त – भोजन – पचन – रक्ताभिसरण – दीर्घ आयुष्य – स्वावलंबी – जीवन स्पर्धा – यश शेवट- चांगले जीवन – आहार – झोप – विश्रांती

वाक्यांचे प्रकार

Image
संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्‍य म्हणतात. वाक्याचे दोन भाग... ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. दिव्यपत्रिका न्यूज  “त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो . ' या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून 'मुलगा' हे उद्देश्य ,  'जातो' हे विधेय आहे. “त्याचा', 'मोठा' हे शब्द उद्देश्याचा विस्तार आहेत,  “दररोज', “आगगाडीने' हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.   वाक्यांचे प्रकार. (१) विधानार्थी वाक्य   या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते. (अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे. (आ) तो रोज व्यायाम करत नाही. (२) प्रश्‍नार्थी वाक्य या प्रकारच्या वाक्यांत प्रश्‍न विचारलेला असतो (अ) तुला लाडू आवडतो का? (आ) तुम्ही सकाळी कधी उठता? (३) उद्गारार्थी वाक्य या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार  काढलेला असतो. (अ) अरेरे ! फार वाईट झाले. (आ) शाबास ! चांगले काम केलेस! (४) आज्ञार्थी वाक्य . या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो. (अ) मुलांनो, रांगेत चला. (आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. स्वाध्याय -  1- पुढ...

लिंगविचार

Image
मराठीत लिंगाचे प्रकार  1. पुल्लिंग 2. स्त्रीलिंग 3. नपुंसकलिंग  Drawing From phys.org पुढील शब्द काळजीपूर्वक बघा व अभ्यासा. गट-अ – पुल्लिंगी शब्द – सजीव - घोडा, माणूस, बगळा, बकरा, कवी, लेखक, रेडा, बैल गट-ब – स्त्रीलिंगी शब्द – सजीव घोडी, बाई, मोलकरीण, कवयित्री, मुंगी, चिमणी, म्हैस गट-क – निर्जीव वस्तू रात्र, पुस्तक, दगड, वाटी, दिवा, मोबाईल, रेल्वे गट-ड – जोडलेले शब्द मीठभाकर, साखरभात, देवघर,भाजीपाला, पाऊसपाणी, बाईमाणूस, प्रश्न- पुढील शब्दांचे लिंग ओळखा. (सर्वनामिक विशेषणे किंवा क्रियापदे मनातल्या मनात वापरुन) रात्र, पुस्तक, दगड, वाटी, झाड, दिवा, मोबाईल, रेल्वे, भात, इमारत, चपाती, खुर्ची, रुमाल, पुस्तक, दगड, घड्याळ, चिंच, पेरू, दही, खेळ, टेबल (मेज), पेन्सिल(लेखणी), क्लास(वर्ग), बुक(पुस्तक), मोटार (गाडी), प्रश्न- लिंग बदला सुतार, कुंभार, दास, तरुण, उंदीर, देव, वानर, बकरा, कोंबडा, गाडा, नवरा, वर, राजा, भाऊ, पुरुष, श्रीमान, कन्या,