वाक्यांचे प्रकार

संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्‍य म्हणतात.

वाक्याचे दोन भाग...
  1. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि
  2. जे सांगायचे ते म्हणजे विधेय.
दिव्यपत्रिका न्यूज 

“त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो.'



या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून 'मुलगा' हे उद्देश्य,
 'जातो' हे विधेय आहे.
“त्याचा', 'मोठा' हे शब्द उद्देश्याचा विस्तार आहेत,
 “दररोज', “आगगाडीने' हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.
 
वाक्यांचे प्रकार.

(१) विधानार्थी वाक्य 

या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.
(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.

(२) प्रश्‍नार्थी वाक्य

या प्रकारच्या वाक्यांत प्रश्‍न विचारलेला असतो
(अ) तुला लाडू आवडतो का?
(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?

(३) उद्गारार्थी वाक्य

या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.
(अ) अरेरे ! फार वाईट झाले.
(आ) शाबास ! चांगले काम केलेस!

(४) आज्ञार्थी वाक्य

. या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.
(अ) मुलांनो, रांगेत चला.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.


स्वाध्याय - 

1- पुढील वाक्यातील उद्देश विस्तार व विधेय विस्तार वेगळे करून लिहा.

  1. आमचा कुत्रा टॉमी बागेत खेळताना पडला.
  2. मी तुम्हाला पत्र लिहिले नाही.
  3. युद्ध संपल्याची बातमी कालच मिळाली.
  4. सगळीच झाडे पावसाळ्यात हिरवी होतात.
  5. हुशार विद्यार्थी नियमित अभ्यास करतात.
  6. पांढरे स्वच्छ दात शोभून दिसतात.
  7. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.
  8. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो.
  9. सरकारी दवाखान्यात खर्च कमी येतो.
2- पुढील वाक्याचे प्रकार ओळखा.
  1. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो.
  2. माझ्यासाठी काही पत्र आहे काय ?
  3. आई गं ! किती लागलंय तुला |
  4. तुझे पुस्तक मला दे.
  5. खूप शीक. खूप मोठा हो.
  6. अबब ! केवढी प्रचंड आग ही !
  7. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस ?
  8. ती माझ्या यशाचा आनंद व्यक्‍त करीत नव्हती.

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ