मराठी शुद्धलेखन- र्‍हस्व दीर्घ

..

https://www.misalpav.com/comment/638495

 

 

 

उदा.

चिन्ह

र्‍हस्व

लहान

पहिली/

पहिला

किंवा

पुन्हा

 U

दीर्घ

मोठी/

मोठा

दुसरी/

दुसरा

ध्यानी

दूर

 – 

...

नियम-

1- एका अक्षराचे शब्द दीर्घ असतात. 
 उदाहरणार्थ- मी, तू  –  ( अपवाद- नि)

2- शब्दांचे पहिले अक्षर र्‍हस्व असते. 
 उदाहरणार्थ- किंवा, पुन्हा U ( अपवाद- 4 नियम)

3- शब्दाचे शेवटचे अक्षर दीर्घ असते. 
 उदाहरणार्थ- आली, जाऊ  –  ( अपवाद- आणि, परंतु)

4)  – U शेवटचे अक्षर र्‍हस्व; तर त्याआधीचे अक्षर दीर्घ. (अशा शब्दांच्या शेवटी "अ" असते.) 
उदाहरणार्थ- माहीत, नागपूर, खूप,

5) U – शेवटचे अक्षर दीर्घ; तर त्या आधीचे अक्षर र्‍हस्व. 
 उदाहरणार्थ- माहिती, सुट्टी, समिती

6) इक, इत प्रत्यय लागून बनलेली विशेषणे. इ र्‍हस्व असतो. 
उदाहरणार्थ- सामाजिक, संस्कारित

7) रफार च्या आधी येणारे अक्षर दीर्घ. (संस्कृत सारख्या शब्दांना. इतर शब्दांना नाही.)
 उदाहरणार्थ- सूर्य, पूर्व, दीर्घ, आशीर्वाद ( खुर्ची- फारसी शब्द)
..... 
आता हे नियम थोडक्यात पाहू -

 

नियम

अपवाद

1

मी, तू -    

(नि)

2

किंवा, पुन्हा U

(4 नियम)

3

जाऊ, आली - 

(आणि, परंतु)

4

- U (अ)  

 

5

U -  

 

6

इक, इत (विशेषणे),

 

7

सूर्य, पूर्व

 


या नियमांना अजून लहान करू -

 

नियम

1

मी, तू -    

2

किंवा, पुन्हा U

3

जाऊ, आली - 

4

- U (अ)  

5

U -  

6

इक, इत (विशेषणे),

7

सूर्य, पूर्व


स्वाध्याय-

1)  पुढील शब्दांना कोणते नियम लागतात ते बघूया.

विचार (2)
वस्तू (3)
आशिया (5)
तुकडे (2)
दिवा (2)
दिवस (2)
कदाचित (6)
ती (1)
कविता (5)
सुरू (2, 5, 3)
आजी (3)
माध्यमिक (6) 
स्फूर्ती (7)

2)  पुढील शब्दांना कोणते नियम लागतात ते सांगा-
माणूस, ऊस, स्थानिक, कठीण, विहीर, कीर्ती, म्हणून, पिशवी, सुपारी, मराठी,

https://www.misalpav.com/comment/638495


....

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

बलसागर भारत होवो- एक सुंदर कविता