गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही - एक उत्कृष्ट भाषण

मुलांनो,

आज तुम्हाला एक अतिशय चांगले, अतिशय आकर्षक आणि खूप काही शिकता येईल असे भाषण ऐकायला देतो आहे. हे भाषण तुमच्यासारखीच एक छोटीशी विद्यार्थिनी प्रिया गायकवाड हिने दिलेले आहे. मला माहित आहे, हे भाषण तुम्हाला निश्चितच खूप खूप आवडणार आहे.




यात प्रियाची भाषा बघा. भाषेवर अतिशय चांगले प्रभुत्व (Mastery) आहे. आत्मविश्वास आहे. आवाजात योग्य ठिकाणी योग्य तो चढ-उतार आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील अशी हृदयाला हात घालणारी जबरदस्त उदाहरणे तिने दिली आहेत. त्यानंतरही विषयावरची पकड पक्की ठेवून, विविध उदाहरणे देत, समर्पक अवतरणे (quotes) देत भाषणाचा प्रवाह प्रचंड परिणाम साधत पुढे जातो. भाषण संपल्यावरही तिच्या भाषणातील मुद्दे, तिच्या भाषणातील विचार आपल्या मनात सतत घोंघावत राहतात.

असे भाषण निव्वळ पाठ करून सादर करता येत नाही. त्यासाठी विविध भाषिक कौशल्य विकसित करावी लागतात. आणि महत्वाचे म्हणजे आपल्या मनातही तसेच उदात्त विचार असावे लागतात.

प्रिया ही तुमच्या सारखी छोटीशी विद्यार्थिनी आहे. ती ज्या  प्रभावीपणे भाषण सादर करू शकते त्याच प्रभावीपणे तुम्ही पण करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. एखादा विषय निवडा. त्याविषयी माहिती मिळवा. चांगल्या प्रकारे लिहून काढा. चांगली अवतरणे टाका. आरशासमोर प्रॅक्टीस करा. सुट्टी आहेच. वेळही भरपूर आहे. एक जबरदस्त भाषण तयार करा. एक उत्कृष्ट भाषण तयार झाले की त्याच प्रकारची अनेक उत्कृष्ट भाषणे करता येतील, असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण होईल. 

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ