Posts

Showing posts from July, 2020

VIII- मी चित्रकार कसा झालो!

Image
प्रस्तावना- निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे. Drawing From Cartoon Valley शब्दांचा अभ्यास- सान्निध्यात - सानिध्य - उपजत - जन्मापासून - inborn स्वानुभवातून - स्व + अनुभव - स्वतःचा अनुभव - self experience मर्जीत - मर्जी - इच्छा पालनपोषण - सांभाळणे- nurturing नाना - अनेक धुंडाळत - धुंडाळणे - शोधणे - search सर्जनाच्या - सर्जन - नवनिर्मिती - creative सर्जनशीलता - नवनिर्मिती करण्याची क्षमता - creativity आपसूक - आपोआप - automatically निसर्गरम्य - सुंदर निसर्ग असलेला - beautiful nature सुसंस्कृत - चांगले संस्कार झालेला - well culture उफाळून - उफाळणे - वेगाने वरती येणे - वात्रटपणा - खोडकरपणा - mischievous दुथडी - दोन्ही किनारे करपवून - करपणे - भाजून निघणे करपवून टाकणारं ऊन - खूप ऊन डोहात - नदीतला खोल भाग गारवा - थंडी मनसोक्त - मन भरून सालटं - त्वचा - skin रेखाटणं - चित्र काढणे लालजर्द - लालभडक - काळाकुट्ट - पांढराशुभ्र - निळाभोर - हिरवागर्द - पिवळट - पांढरट - ...

औपचारिक पत्रलेखन

Image
पुढील माहिती वाचा, ही माहिती नोटबुक मध्ये लिहिण्याची गरज नाही. Assignment मध्ये दिलेला प्रश्न Composition NoteBook मध्ये सोडवावा. पत्र लिहिताना पुढील महितीचा उपयोग होईल. पत्र लेखनावर विडिओ तयार झाल्यावर देण्यात येईल. पत्र-लेखन  =========== पत्रांचे प्रकार औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र ========= अनौपचारिक पत्र- कोणाला- कौटुंबिक व्यक्ती, नात्यातल्या व्यक्ती, आपुलकीचे संबंध असलेल्या व्यक्ती, मित्र-मैत्रिणी अशांना लिहिलेले पत्र पत्राचे स्वरूप- वैयक्तिक, खाजगी, भावनांचे प्रकटीकरण, अभिनंदन, आभार, सांत्वन, क्षेमकुशल विचारणे पत्रात विषय लिहिण्याची गरज नाही. ========== औपचारिक पत्र कोणाला- सरकारी कार्यालय, कंपन्यांची कार्यालये, विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, उद्योग व्यवसाय, अधिकारी वर्ग, व्यवस्थापक, संचालक, लोकप्रतिनिधी, पत्राचे स्वरूप- कार्यालयीन कामकाज, व्यावसायिक हेतू, तसेच विशिष्ट कामासाठी, माहिती, चौकशी, तक्रार, मागणी, विनंती, अर्ज, खरेदी-विक्री, पत्रात विषय लिहिणे आवश्यक तो विषय व उद्देश याविषयीच मजकूर लिहिणे आवश्यक. मजकूर थोडक्यात; पण सर्वसमावेशक असावा. यात ...

Boy Climbs a Mountain Daily For Online Classes

Image
‘Want To Be IAS Officer’: 12-YO Boy Who Climbs a Mountain Daily For Online Classes ‘आयएएस अधिकारी व्हायचंय’: 12 वर्षांचा मुलगा जो ऑनलाईन क्लासेससाठी नेटवर्क मिळावे म्हणून दररोज पर्वतावर जाऊन बसतो. ============ राजस्थानच्या पाचपाद्र गावात हरीश नावाच्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्याने डोंगरावर चढायला सुरुवात केली तेव्हापासून आजचा 34 वा दिवस आहे. Today marks the 34th day since Harish, a class 7 student, started scaling a mountain in Pachpadra village of Rajasthan. त्याला पर्वतारोहण किंवा एव्हरेस्ट चढण्याची इच्छा नाही. त्याच्या फिटनेस गोलचादेखील हा भाग नाही. No, he does not wish to be a mountaineer or climb Everest. Neither is this part of his fitness goals. जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारा मुलगा आपल्या ऑनलाइन वर्गात चुकवू नये म्हणून रोज 15 मिनिटे ट्रेक करतो. पुस्तके, एक खुर्ची आणि टेबल आणि स्मार्टफोनसह सशस्त्र हरीश सकाळी 7.20 च्या सुमारास आपल्या भावासोबत घरून निघून जातो कारण डोंगरावर तेथे जास्तीत जास्त नेटवर्क कव्हरेज मिळते. The boy studying in Jawahar Navodaya Vidyalaya treks for 15 minute...

IX- संतकृपा झाली

Image
प्रस्तावना- समाजात जातिभेद, अंधश्रद्धा अशा वाईट गोष्टींनी थैमान घातले होते. यांच्या आधारे लोकांचे प्रचंड शोषण चालले होते. ते थांबवण्यासाठी व लोकांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी संतांनी वारकरी पंथाची स्थापना केली. या वारकरी संप्रदायाचा इतिहास संत बहिणाबाई यांनी या अभंगात थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगितला आहे. संतकवयित्री बहिणाबाई या संत तुकारामाच्या शिष्य आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हा अभंग पुढे देत आहे. तो ऐका. तुम्हाला नक्की आवडेल. शब्दांचा अभ्यास- वारकरी - पंढरपूरची वारी (यात्रा) करणारे - Pilgrims संतकृपा - संतांची कृपा, कार्य # कृपा = graciousness,mercy फळास येणे - पूर्ण होणे - To bear fruit - पाया - तळ - Foundation, base पाया रचणे - स्थापना करणे - To establish रचिला - रचणे - तयार करणे - to construct देवालय - देव + आलय - मंदिर - Temple किंकर = पालन करणारा, सेवक - follower, attendant आवार - अंगण, पटांगण - Courtyard दिधला - दिला सावकाश - शांतपणे - without hurry, Quietly कळस - शिखर, उच्च स्थान - Pinnacle, top ध्वज - झेंडा - flag फडकणे - लहरणे - fl...

IX- मराठी- काझीरंगा- शब्दांचा अभ्यास

Image

X - शाल - शब्दांचा अभ्यास

Image
Wikipedia निमित्ताने - निमित्त - कारण - Reason खेळण्याच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी गेलो. काहीना काही निमित्त काढून तो पैसे मागतो. बेतात - बेत - तयारी, कार्यक्रम # निघण्याच्या बेतात असणे - जाण्याच्या तयारीत असणे गौरव - सन्मान - honour एका पायावर हो म्हणणे - संपूर्ण तयारी दाखवणे - विश्वकोशाचा - मराठी संदर्भ ग्रंथ - मराठी ज्ञानकोशाचे नाव - कोश - कोशाचा - encyclopaedia दक्षिणेकडील - दक्षिण - पूर्वेकडील - पश्चिमेकडील - उत्तरेकडील कविवर्य - मोठा कवी अहोरात्र - रात्रंदिवस - Day and night भरती - मोठ्या प्रमाणात असणे, (समुद्राची भरती - high tide) - जास्त गर्दी उद्या समुद्राला भरती येईल. शुक्रवारी बाजारात लोकांची भरती येते. श्रीफळ - नारळ ( सन्मान करताना, पूजा विधी करताना श्रीफळ हा शब्द वापरतात) शालीन - सुसंस्कारित, नम्र, Decent, Modest, gentle, cultured (# अनेक शाली जवळ असणारा- उपरोधिक अर्थ) शालीनता - नम्रता, संस्कारितपणा, decency, modesty उपरोधिक - sarcastic - उपरोध sarcasm - टोमणा - , उपरोधिक खोच - satirical clue मुळातच - मूळ - originally कर्जबाजारी ...

VIII- प्रभात

Image
ऐका. वाचा. म्हणा हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण, बाग मनोहर फुला-पाखरांचे जग सुंदर आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्त्वाची प्रयोगशाळा व्यक्‍तित्वाची, तन सुदृढ, मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्त्वांची विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. किशोर बळी

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ

Image
कवितेची प्रस्तावना-  पाणी हे आपले जीवन आहे, त्याशिवाय आपण जगू शकत नाही, पाणी आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. परंतु नैतिक, प्रामाणिक, निस्वार्थी, निर्लोभी इत्यादी गुण असलेला योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांत देऊन संत एकनाथ यांनी सांगितले आहे.  Thanks Wikipedia योग आणि योगी ========= भारतीय संस्कृतीत योग हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने आला आहे. योग: कर्मसु कौशलम् | आपल्या कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग. आपले काम जास्तीत जास्त कौशल्याने (Skillfully) जास्तीत जास्त चांगले करणे म्हणजे योग. योगः चित्त-वृत्ति निरोधः | आपल्या चित्तवृत्तीला (मनाला) नियंत्रणात ठेवणे म्हणजे योग. अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य ( इंद्रियांवर संयम ठेवणे) आणि अपरिग्रह ( आवश्‍यकतेपेक्षा वस्तू- संपत्ती यांचा साठा न करणे) या तत्त्वांचे पालन करणे म्हणजे योग. या पाच तत्त्वांना यम असे म्हटले आहे. शरीर आणि मन स्वच्छ ठेवणे, संतुष्ट आणि प्रसन्न राहणे, स्वयंशिस्त पाळणे, आत्मचिंतन करणे, ईश्वर चिंतन करणे या पाच नियमांचे पालन करणे म्हणजे योग. भरपूर ज्ञान मिळवणे म्हणजे योग. त्यासाठी ...

IX- भेटीलागी जीवा लागलीसे आस

Image
प्रस्तावना- “भेटीलागी जीवा” हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे. यात त्यांची विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे.  अर्थ- भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥ अर्थ- संत तुकाराम विठ्ठलाला म्हणतात, तुझ्या भेटीची मला तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची वाट पाहत आहे. पूर्णिमेचा चंद्रमा चाकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥२॥ अर्थ- चकोर पक्षी पौर्णिमेचे चांदणे प्राशन करून जगतो. पौर्णिमेचा चंद्र हा चकोर पक्षाचे जीवन आहे. त्यामुळे तो पौर्णिमेच्या चंद्राची अत्यंत आतुरतेने वाट पाहतो. त्याच प्रमाणे मीसुद्धा विठ्ठलाची वाट पाहत आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥ अर्थ- सासरी गेलेल्या मुली माहेरी जाता यावे म्हणून दिवाळीची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे पंढरपूरला जाण्याची मी तीव्रतेने वाट पाहत आहे. भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे उरि माऊलीची||४|| अर्थ- लहान बाळ भुकेने व्याकुळ झाला आहे. काहीतरी खायला प्यायला मिळावे म्हणून तो आईसाठी अतिशय शोक करतो. त्याप्रमाणे मी सुद्धा तुझी व्याकुळतेने वाट पाहत आहे. तु...

आम्ही चालवू हा पुढे वारसा- शब्दांचा अभ्यास व कवितेचा अर्थ

Image
प्रस्तावना- गुरू या शब्दाचा अर्थ बराच मोठा आहे. गुरु म्हणजे आपल्याला ज्ञान देणारा. किंवा ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेतो त्यांना आपण गुरु म्हणतो. गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठा असू शकतो, गुरु आपल्यापेक्षा वयाने लहानही असू शकतो. गुरु जवळ असू शकतो, गुरु दूर असू शकतो. आई ही पहिली गुरु आहे, असे म्हटले जाते. ग्रंथ हेच गुरु, निसर्ग हा मोठा गुरु आहे... अशी वाक्य आपण ऐकत असतो. म्हणजेच गुरु सजीव असू शकतो, तसेच गुरु निर्जीवही असू शकतो. इंटरनेट, कम्प्युटर हे आपले गुरु बनले आहेत. त्यांच्या पासून चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात. तसेच वाईट शिकवणुकी पासून दूरही राहायचे असते. महत्वाचे शब्द / शब्दांचा अभ्यास वसा / ज्ञानरूपी वसा / वारसा / स्नेह स्नेही / माऊली / कल्पवृक्ष / तळ तळी / कवडसा / अंकुर / फलद्रुप / धीरता शूरता वीरता नम्रता / विद्येसवे (सवे) / ध्यास / दुष्ट / शासन / सज्जन (सत् + जन) / पालन / मानसी / ठसा / त्याग / फळास येणे / पुण्यवंत / भल्या (भला माणूस) अर्थ- गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा अर्थ- जेथून आम्ही ज्ञान मिळवतो, त्या सर्व गोष्टी आमच्या गुरु होत. गुरूने ...

VIII- आम्ही चालवू हा पुढे वारसा

Image
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे गीत ऐका व चालीत म्हणा- गीत- गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा पिता-बंधू-स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा शिकू धीरता, शूरता, वीरता धरू थोर विद्येसवे नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा तुझी त्याग सेवा फळा ये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी अगा पुण्यवंता भल्या माणसा गीतकार : जगदीश खेबुडकर, गायक : अनुराधा पौडवाल - सुरेश वाडकर, संगीतकार : प्रभाकर जोग, चित्रपट : कैवारी (१९८१) AMHI CHALVU HA PUDHE VARSA-- KARAOKE महत्वाचे शब्द, अभंग, अर्थ, स्वाध्याय, अध्यापन विडियो लवकरच देत आहे.

सर्वात्मका शिवसुंदरा- शब्द, प्रस्तावना, अर्थ

Image
प्रस्तावना- सृष्टीतील गूढ गोष्टींची कारणे मानवाला समजली नाही, तेव्हा त्या गोष्टींच्या मागे अद्भुत शक्ती असावी अशी कल्पना माणसाने केली. या कल्पनेतून देव-ईश्वर यांच्या विविध कल्पना निर्माण झाल्या. या कवितेत कवी कुसुमाग्रज यांनी परमेश्वराची एक सुंदर कल्पना आपल्यासमोर ठेवली आहे. या कवितेतील परमेश्वर सर्वत्र राहणारा, सर्वांमध्ये वसणारा, चांगल्या गोष्टीं करणारा, वाईट गोष्टी दूर करणारा, अडचणींमध्ये मदत करणारा अशा प्रकारचा आहे. महत्वाचे शब्द. पुढील शब्दांचा अभ्यास करा सर्वात्मका - सर्व+ आत्मका - सर्वांच्या ठिकाणी असलेला शिव - पवित्र सुंदरा - वागणे, विचार, दिसणे या सर्व बाबतीत सुंदर असलेल्या अभिवादन - नमस्कार सुमन - सु + मन - चांगले मन, फूल तारा/ तारे- तार्‍यां सामान्य रूप ( वाऱ्या, घोड्या, वाड्या .... ) सद्धर्म सत् + धर्म- चांगला धर्म. वसणे- वसतोस ( जातोस , बसतोस, श्रमतोस, पुसतोस, धावतोस .... ) राबसी - राबणे - कष्ट करणे श्रमिक - कामगार सवे - सोबत रंजले - दुःखीकष्टी गांजले - इतरानी त्रास दिलेले आसवे पुसणे - दुःख दूर करणे न्यायार्थ - न्याय+ अर्थ (ध्येयार्थ, ज्ञानार्थ, दे...

संतवाणी- अंकिला मी दास तुझा - संत नामदेव

Image
प्रस्तावना- देवधर्माच्या नावावर लोकांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी, वाईट परंपरा संपवण्यासाठी, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, विषमता नष्ट करण्यासाठी वारकरी संप्रदायाने प्रचंड प्रयत्न केले. आपण स्वतः भक्ती करून देवापर्यंत पोचू शकतो, लोकांना जाणवून दिले. त्यासाठी विठ्ठल/ पांडुरंग ही देवता संतांनी लोकांपुढे ठेवली. लोकांनी विठ्ठलाचा स्वीकार करावा यासाठी विठ्ठलाचे गुणगान करणारे अभंग लिहिले. याच प्रकारे “ अंकिला मी दास तुझा” या अभंगातून विविध दृष्टांत वापरून विठ्ठलाच्या प्रेमाचे वर्णन केलेले आहे. Thanks- Wikipedia अग्निमाजि पडे बाळू | माता धावे कनवाळू||1|| अर्थ- बाळ अग्नीमध्ये पडला, आग असेल तेथे गेला, त्याला चटका बसला, त्याला भाजले तर दयाळू आई त्याच्यासाठी धावून जाते. त्याच प्रमाणे संत नामदेव ज्यावेळी संकटात असतात त्या त्या वेळी विठ्ठल दयाळूपणे त्यांना वाचायला धावून जातो. तैसा धावे माझिया काजा | अंकिला मी दास तुझा ||2|| अर्थ-  बाळ संकटात असताना त्याला वाचवण्यासाठी आई धावून जाते त्याच प्रमाणे संत नामदेव संकटात असताना विठ्ठल धावून जातो. विठ्ठलाच्या या कनवाळू स्वभावामुळे संत...

तू बुद्धि दे- अर्थ व स्वाध्याय

Image
कवी- गुरू ठाकूर   =========. प्रस्तावना- जगात मानवाच्या भल्यासाठी प्रचंड कार्य केलेल्या अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जे आर डी टाटा, एपीजे अब्दुल कलाम, लता मंगेशकर अशी काही उदाहरणे देता येतील. अशा थोर लोकांमुळे आपल्यासमोर आदर्श निर्माण होतात, आपल्याला स्फूर्ती मिळते, आपल्याला चांगली बुद्धी मिळते, नवी ऊर्जा मिळते, मोठा आत्मविश्वास मिळतो. अशा थोर आदर्शांकडून विविध गोष्टींची अपेक्षा या कवितेत करण्यात आली आहे. ===. कविता- तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे… महत्त्वाचे शब्द- (समजून घ्या व त्यांचा अर्थ लिहा)- तेज नवचेतना विश्वास सत्य सुंदर सर्वथा आजन्म ध्यास अर्थ- या आदर्श व्यक्तींकडून आपल्याला चांगली बुद्धी मिळवा, आपल्या जीवनात ज्ञानाचे तेज ( प्रकाश) निर्माण होवो. आपल्याला नवीन चेतना, नवी ऊर्जा व स्फूर्ती मिळो. या थोर लोकांचे कार्य सत्यावर आधारलेले आहे, सौंदर्याने भरलेले आहे. त्यामुळे जगात जे जे सत्य आहे व जे जे सुंदर आहे, त...