VIII- आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे गीत ऐका व चालीत म्हणा-





गीत-
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधू-स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा

जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा

तुझी त्याग सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा

गीतकार : जगदीश खेबुडकर,
गायक : अनुराधा पौडवाल - सुरेश वाडकर,
संगीतकार : प्रभाकर जोग,
चित्रपट : कैवारी (१९८१)

AMHI CHALVU HA PUDHE VARSA-- KARAOKE

महत्वाचे शब्द, अभंग, अर्थ, स्वाध्याय, अध्यापन विडियो
लवकरच देत आहे.

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ