गाढवांवरचं ग्रंथालय (Real Story)
Photo Credit - https://helian.net/ कोलंबियाच्या घनदाट अरण्यात लुईस राहत असे. त्याला वाचनाची खूप आवड होती. एक पुस्तक वाचून संपवलं की विलंब न लावता तो दुसरं पुस्तक घरी घेऊन येई. लवकरच त्याच्या घरात जिकडे तिकडे पुस्तकंच पुस्तकं झाली. त्याची बायको डायना त्याच्यावर खूप वैतागायची. ‘या इतक्या सगळ्या पुस्तकांची खीर करायची का? की भातासोबत पुस्तकांची भाजी खायची?’ डायना त्याला असे प्रश्न विचारायची. लुईसनं खूप विचार केला. मग त्याला एक कल्पना सुचली- आपल्याकडची पुस्तकं डोंगरापलीकडच्या लोकांना वाचायला द्यायची. त्यांच्याजवळ ही पुस्तकं नसतील. त्यानं लगेच निर्णय घेतला आणि मनाशी पक्कं केलं- ‘एका गाढवावर मी ही पुस्तकं लादेन आणि दुसऱ्यावर मी स्वत: स्वार होईन.’ मग लुईसनं दोन धडधाकट गाढवं विकत घेतली. एका गाढवाचं नाव ठेवलं- अल्फा आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं- बीटा. गाढवांच्या पाठीवर पुस्तकं ठेवण्यासाठी त्यानं मजबूत थैल्या बनवल्या आणि त्याच्यावर एक पाटी टांगली- ‘गाढवांवरचं ग्रंथालय.’ गाढवाच्या पाठीवर पुस्तकं लादायला डायनानं लुईसला मदत केली आणि मग प्रत्येक आठवडय़ाला लुईस, अल्फा आणि बीटा दूरदूरच्या डोंगरात आणि आड...